बीड

बीड जिल्ह्यात आज 198 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 6600 बाधीत

बीड जिल्ह्यात आज दि 31 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 5012 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 198 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4814 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 9 आष्टी 47 बीड 61 धारूर 6 गेवराई 18 केज 9 माजलगाव 2 पाटोदा 16 शिरूर 21 वडवणी 9 असे रुग्ण आढळून आले आहेत

दिवसभरात राज्यात ६ हजार ६०० नवीन करोनाबाधित

राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण काहीसे कमी झाल्याचे दिसून येत असले, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय रुग्णांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या करोनामुक्त झालेल्यांपेक्षा कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. आज दिवसभरात राज्यात ६ हजार ६०० नवीन करोनाबाधित आढळून आले, तर ७ हजार ४३१ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, राज्यात आज २३१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६०,८३,३१९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.६१ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,९६,७५६ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १,३२,५६६ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली असून,
सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *