बीड जिल्ह्यातील चार तालुक्यात प्रवेश करणारांची चेकपोस्ट वर होणार अँटीजेनटेस्ट
कोरोना विषाणू (कोव्हीड-19) प्रादुर्भाव नियंत्रणासाठी व उपाययोजनाबाबत दिशानिर्देश.
ज्याअर्थी, बीड जिल्ह्यामधील आष्टी गेवराई शिरूर आणि पाटोदा या तालुक्यातील दुसऱ्या लाट येतील covid-19 बाधित रुग्णांची संख्या अद्यापही लक्षणीयरीत्या कमी होत नाही.
ज्या अर्थी, सदरची रुग्णसंख्या तातडीने आटोक्यात आणणे गरजेचे आहे आणि ज्याअर्थी तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पाश्वभूमीवर ती निर्माण होणाऱ्या बाधित रुग्ण संख्येचा अतिरिक्त ताण संपूर्ण जिल्हा प्रशासनावर येण्याची शक्यता आहे.
त्या अर्थी, बीड जिल्ह्यामधील आष्टी गेवराई शिरूर आणि पाटोदा या चार तालुक्यांमध्ये संलग्न असलेल्या नगर तालुक्यातील लोकांचे येणे जाणे हे निबंधित व्हावे व त्यावर नियंत्रण आणावे या दृष्टिकोनातून आष्टी गेवराई शिरूर आणि पाटोदा या तालुक्यांच्या सीमावर्ती चेक पोस्ट लावणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने विविध यंत्रणांना खालीलप्रमाणे आदेशित करण्यात येत आहे-
- बीड जिल्ह्यामधील आष्टी, गेवराई, शिरूर आणि पाटोदा या तालुक्यांमधील सर्व क्षेत्रीय पोलीस अधिकाऱ्यांनी अहमदनगर जिल्हयांस लागुन असलेल्या सीमावर्ती भागातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा मार्गावर चेक पोस्ट निर्माण करावेत.
- संबधित तहसिलदार यांनी सदर चेक पोस्ट च्या ठिकाणी पोलीस विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग व जिल्हा परिषद यांचेकडील कर्मचाऱ्यांची नियुक्ती दोन शिफ्टमध्ये करावी व याबाबतचे आदेश दिनांक. 31.07.2021 रोजी पर्यंत निर्गमित करावेत.
- संबधित तहसिलदार यांनी चेकपोस्ट ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणेबाबत कार्यवाही करावी.
- जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सदर चेकपोस्ट ठिकाणी अँटीजन टेस्ट करण्याबाबतची सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत कार्यवाही अनुसरावी. सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणा आणि सर्व संबधित विभागांची
राहील. उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल. सदरचे आदेश दि.30.07.2021 रोजी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सही शिक्यानिशी दिले आहेत.