बीड जिल्ह्यात आज 241 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 6258 तर देशात 29689 बाधीत
बीड जिल्ह्यात आज दि 28 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 5009 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 241 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4768 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 5 आष्टी 44 बीड 50 धारूर 16 गेवराई 29 केज 10 माजलगाव 5 परळी 1 पाटोदा 33 शिरूर 39 वडवणी 9 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात ६ हजार २५८ नव्या रुग्णांची नोंद
राज्यात करोना रुग्ण संख्येत झपाट्याने घट होत असून रुग्ण बरे होण्याचं प्रमण ९६.५४ टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यात आज १२ हजार ६४५ रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा ६० लाख ५८ हजार ७५१ वर पोहोचला आहे. तर आज बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत नव्या रुग्णांची संख्या कमी होती. राज्यात ६ हजार २५८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एकूण ८२,०८२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात मागच्या २४ तासात २५४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे .सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.
देशात २९ हजार ६८९ नव्या बाधितांचे निदान
सोमवारी देशात ३९ हजार ३६१ इतके नवे बाधित आढळले तर ४१६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती तर कालच्या तुलनेत आज मंगळवारी देशात बाधितांचा आकडा तब्बल ९ हजारांनी घसरला आहे. गेल्या २४ तासात देशामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान, २९ हजार ६८९ नव्या बाधितांचे निदान करण्यात आले तर ४१५ जणांना आपला जीव दिवसभरात कोरोनामुळे गमवावा लागला आहे.
देशात गेल्या २४ तासात ४२ हजार ३६३ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत २९ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित आढळले असून ४१५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४२ हजार ३६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख २१ हजार ३८२ जणांचा मृत्यू झाला असून दिलासादायक बाब म्हणजे ३ कोटी ६ लाख २१ हजार ४६९ जण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या ३ लाख ९८ हजार १०० जणांवर उपचार सुरू आहेत.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)
व्यवसाय तुमचा प्रसिद्धी आमची
कोरोना काळात व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा असंख्य ग्राहकांपर्यंत आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्याची संधी
मासिक जाहिरातीसाठी 50%टक्के सवलत
त्वरित सम्पर्क साधा
संपादक-लोकांक्षा न्यूज
9422295499,8830556699