बीड जिल्ह्यात आज 200 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 4877 तर देशात 39361 बाधीत
बीड जिल्ह्यात आज दि 27 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3476 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 200 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3276 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 5 आष्टी 55 बीड 34 धारूर 8 गेवराई 13 केज 15 माजलगाव 4 परळी 1 पाटोदा 25 शिरूर 25 वडवणी15 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात ४ हजार ८७७ नवीन करोनाबाधित
राज्यात आढळलेल्या करोनाबाधितां पेक्षा करोनातून बरे झालेल्यांची संख्या ही दुपटीहून अधिक आढळल्याचे दिसून आले आहे. दिवसभरारत राज्यात ११ हजार ७७ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ४ हजार ८७७ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय राज्यात आज ५३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ६०,४६,१०६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.४३ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.
देशात 24 तासांत 39,361 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावात घट होताना दिसत आहे. सध्या भारतात 40 हजारांच्या आसपास नव्या कोरोनाबाधितांची दररोज नोंद केली जाते. सलग चौथ्या दिवशी देशात 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 39,361 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. 416 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 35,968 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
देशात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या चार लाखांहून अधिक आहे.
एकूण 4 लाख 11 हजार रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत तीन कोटी 14 लाख 11 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 20 हजार 967 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, 3 कोटी 5 लाख 3 हजार रुग्ण कोरोनामुक्त ही झाले आहेत.
व्यवसाय तुमचा प्रसिद्धी आमची
कोरोना काळात व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा असंख्य ग्राहकांपर्यंत आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्याची संधी
मासिक जाहिरातीसाठी 50%टक्के सवलत
त्वरित सम्पर्क साधा
संपादक-लोकांक्षा न्यूज
9422295499,8830556699
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)