बीड जिल्ह्यात आज 170 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 6843 तर देशात 39361 बाधीत
बीड जिल्ह्यात आज दि 26 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3597 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 170 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3427 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 3ल6 आष्टी 58 बीड 39 धारूर 21 गेवराई 4 केज 6 माजलगाव 5 पाटोदा 20 शिरूर 7 वडवणी 4 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात ६ हजार ८४३ नवीन रुग्णांचे निदान
मुंबई : राज्यातील करोना (Coronavirus) प्रादुर्भाव आटोक्यात असला तरीही आकड्यांमधील चढ-उतार अजूनही सुरूच आहे. राज्यात आज पुन्हा ६ हजार ८४३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसंच १२३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात आज ५ हजार २१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण ६० लाख ३५ हजार ०२९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.३३ टक्के एवढे झाले आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.
देशात ३९ हजार ३६१ इतके नवे कोरोना बाधित
देशात सध्या दररोज ४० हजारांच्या आसपास नव्या बाधितांची नोंद केली जाते. सलग चौथ्या दिवशी देशात ४० हजारांहून कमी बाधितांची नोंद करण्यात आली असून देशाची चिंता कमी झाल्याचे दिसतेय. आज सोमवारी देशात ३९ हजार ३६१ इतके नवे कोरोना बाधित आढळले तर ४१६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यासह ३५ हजारांहून अधिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. रविवारी करण्यात आलेल्या बाधितांच्या नोंदीपेक्षा आजच्या आकड्यात काहिशी घट झाल्याचे समोर आले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३९ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित आढळले असून ४१६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
तर ३५ हजार ९६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून आतापर्यंत ३ कोटी १४ लाख ११ हजार रुग्णांना लागण झाली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख २० हजार ९६७ जणांचा मृत्यू झाला असून दिलासादायक बाब म्हणजे ३ कोटी ५ लाख ७९ हजार १०६ जण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या ४ लाख ११ हजार १८९ जणांवर उपचार सुरू आहेत.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)
व्यवसाय तुमचा प्रसिद्धी आमची कोरोना काळात व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा असंख्य ग्राहकांपर्यंत आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्याची संधी मासिक जाहिरातीसाठी 50%टक्के सवलत त्वरित सम्पर्क साधा
संपादक-लोकांक्षा न्यूज
8830556699