बीड

बीड जिल्ह्यात आज 176 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 6753 कोरोना रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 24 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3813 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 176 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3637 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 40 बीड 47 धारूर 9 गेवराई 8 केज 16 माजलगाव 6 परळी 2 पाटोदा 20 शिरूर 20 वडवणी 4 असे रुग्ण आढळून आले आहेत

२४ तासांत राज्यात ६ हजार ७५३ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई: राज्यात गेल्या २४ तासांत एकूण ६ हजार ७५३ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. या बरोबरच आज एकूण ५ हजार ९७९ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आज दिवसभरात एकूण १६७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (maharashtra registered 6753 new cases in a day with 5979 patients recovered and 167 deaths today)

आजच्या १६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख २२ हजार ४८५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ टक्के एवढे झाले आहे.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या खाली आली असून ती ९४ हजार ७६९ इतकी झाली आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *