ऑनलाइन वृत्तसेवावृत्तसेवा

पावसाचं रौद्ररूप! चिपळूणमध्ये २००५ ची पुनरावृत्ती, संपूर्ण शहर पाण्याखाली

राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीमध्ये नद्यांना पूर आला आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरं, दुकानं आणि गाड्या पूर्ण पाण्याखाली गेल्या आहेत. चिपळूण शहरात अनेक ठिकाणी पुराचे पाणी भरल्याने 2005 ची पुनरावृत्ती झाल्याची स्थिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिपळूण-कराड मार्गे चिपळूण-मुंबई मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

राजापूर परिसरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे काजळी नदी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे राजापूर नगरपरिषदने भोंगा वाजवून नागरिकांना याबाबत इशारा दिला आहे. काजळी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्याने नदीजवळील सर्व व्यावसायिकांना सुरक्षित जागी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही बचावकार्य सुरू झाल्याची माहिती दिली आहे. गंभीर स्थिती असलेल्या घटना स्थळी लवकरात लवकर हेलिकॉप्टर सुविधा पोहचविण्याचे आदेश देण्यात आलेले असून संपूर्ण परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग सतत लक्ष ठेवून आहे, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तर, चिपळूणकरता एनडीआरच्या दोन टीम रवाना झालेले आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी वेगाने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात येत असून कोस्टल गार्डच्या मदतीने बोटी सुद्धा उपलब्ध करण्यात आले आहे. फूड पॅकेट्स व इतर मेडिकल सहकार्य उपलब्ध करून देण्यात येत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *