बीड

बीड जिल्ह्यात आज 160 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 8159

बीड जिल्ह्यात आज दि 22 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4411 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 160 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4251 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 3 आष्टी 55 बीड 31 धारूर 10 गेवराई 11 केज 13 माजलगाव 3 परळी 1 पाटोदा 14 शिरूर 12 वडवणी 7 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात ८ हजार १५९ नवीन कोरोनाबाधित

बुधवारी कोरोनाबाधितांची संख्या कोरोनातून(Corona Patients) बरे झालेल्यांपेक्षा अधिक आढळून आली आहे. मागील २४ तासांत राज्यात(Maharashtra) ८ हजार १५९ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ७ हजार ८३९ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

राज्यातील(Coroma Maharashtra Update) कोरोना संसर्गाची दुसरी लाट(Corona Second Wave) ओसरत असली, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित(Corona Patients) आढळून येत आहेत. आज कोरोनाबाधितांची संख्या कोरोनातून बरे झालेल्यांपेक्षा अधिक आढळून आली आहे. मागील २४ तासांत राज्यात ८ हजार १५९ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ७ हजार ८३९ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

याशिवाय राज्यात आज १६५ कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ६०,०८,७५० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३३ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत १,३०,९१८ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *