बीड जिल्ह्यात आज 211 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 6017 तर देशात ऑगस्टमध्ये तिसऱ्या लाटेचा इशारा
बीड जिल्ह्यात आज दि 20 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3579 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 211 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3368 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 10 आष्टी 43 बीड 36 धारूर 5 गेवराई 14 केज 10 माजलगाव 5 परळी 1 पाटोदा 28 शिरूर 42 वडवणी 17 असे रुग्ण आढळून आले आहेत
२४ तासात राज्यात ६,०१७ नवीन रुग्णांची नोंद
राज्यात आठवड्याच्या पहिल्याच दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले आहे. तसेच राज्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूसंख्येतही मोठी घट झाली आहे. दरदिवशी राज्यातील मृत कोरोनाबाधितांचा आकडा हा ५०० हून अधिक होता परंतु सोमवारी १९ जुलै रोजी एकूण ६६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर पोहोचला आहे. महाराष्ट्रात मागील २४ तासात ६ हजार १७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १३ हजार ५१ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली असली तरी तज्ज्ञांकडून ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात मागील २४ तासात १३ हजार ५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५९ लाख ९३ हजार ४०१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.३५ % एवढे झाले आहे. गेल्या २४ तासात राज्यात ६,०१७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६२ लाख २० हजार २०७ झाली आहे. राज्यात सध्या एकूण ९६ हजार ३७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
देशात ऑगस्ट अखेरपर्यंत तिसरी लाट येण्याची शक्यता
नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या हळुहळू कमी होत आहे. पण, तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा इशाराही देण्यात आलाय. या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि सर्व राज्य सरकारं सतर्क झाली आहेत. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च(ICMR)ने आपल्या एका रिपोर्टचा हवाला देत देशात ऑगस्ट अखेरपर्यंत तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
आयसीएमआरने सांगितल्यानुसार, देशात ऑगस्ट अखेरपर्यंत दररोज एक लाख रुग्ण सापडतील. पण, कोरोनाची तिसरी लाट पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेइतकी भयावः नसेल, असंही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. दुसऱ्या लाटेमध्ये दररोज आढळणाऱ्या नवीन कोरोना रुग्णांची संख्या चार लाखांपर्यंत पोहोचली होती.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)