बीड जिल्ह्यात आज 113 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात आणि देशात रूग्ण वाढ
बीड जिल्ह्यात आज दि 19 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4531 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 113 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4418 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 5 आष्टी 25 बीड 28 धारूर 4 गेवराई 6 केज 7 माजलगाव 10 पाटोदा 12 शिरूर 10 वडवणी 6 असे रुग्ण आढळून आले आहेत
चिंताजनक! करोना रुग्णसंख्येत वाढ; आज ९ हजार नव्या रुग्णांचे निदान
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कमी होणारी दैनंदिन करोना रुग्णांची संख्या आज वाढली असून हा बदल चिंतेत भर घालणारा आहे. राज्यात गेल्या २४ तासांत एकूण ९ हजार नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले असून कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. काल ८ हजार १७२ रुग्णांचे निदान झाले होते. तसेच आज तुलनेने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही घटली असून आज एकूण ५ हजार ७५६ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आज एकूण १८० रुग्णांनी प्राण गमावले आहेत.
आजच्या १८० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख ८० हजार ३५० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२४ टक्के एवढे झाले आहे.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ०३ हजार ४८६ इतकी झाली आहे.
देशात कोरोना बाधीतांची २ हजारांची वाढ
देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आज पून्हा वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसरी लाटेचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ४० हजारांच्या आत असलेली रुग्णसंख्या पुन्हा ४० हजारांच्या पार पोहचली आहे. यात शनिवार नोंद झालेल्या नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येच्या तुलनेत आज २ हजारांची वाढ झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत ४१ हजार १५७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५१८ कोरोनाग्रस्तांनी प्राण गमावले आहेत. यात दिलासाजनक बाब म्हणजे देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांत एकूण ४२ हजार ००४ कोरोना रुग्ण बर हऊन घरी परतले आहेत.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)