बीड

बीड जिल्ह्यात आज 174 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 8172 तर देशात 38079 बाधीत

बीड जिल्ह्यात आज दि 18 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4954 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 174 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4780 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात आष्टी 52 बीड 26 धारूर 4 गेवराई 12 केज 11 माजलगाव 7 पाटोदा 20 शिरूर 32 वडवणी 10 असे रुग्ण आढळून आले आहेत

दिवसभरात राज्यात ८ हजार १७२ नवीन करोनाबाधित

काल दिवसभरात राज्यात ८ हजार ९५० रूग्ण करोनातून बरे झाले असून, ८ हजार १७२ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय राज्यात आज १२४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येपेक्षा कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५९,७४,५९४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.२८ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे.

देशात गेल्या 24 तासांत करोनाचे 38 हजार 79 रुग्ण

नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत करोनाचे 38 हजार 79 रुग्ण आढळून आले असून याच अवधीत देशात करोनामुळे 560 जणांचे मृत्यू झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे रोज सकाळी आठ वाजता देशातील करोना स्थितीची गेल्या 24 तासांतील माहिती दिली जाते त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, देशातील ऍक्‍टिव्ह पेशंट्‌सची संख्या आता कमी होऊन ती 4 लाख 24 हजार 25 इतकी झाली असून ऍक्‍टिव्ह केसेसचे प्रमाण 1.36 टक्‍के इतके आहे. देशाचा डेली पॉझिटिव्हिटी रेट काल 1.91 टक्के इतका नोंदवण्यात आला.

गेले 26 दिवस तो सतत तीन टक्‍क्‍यांच्या खाली राहिला आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 2.10 टक्के इतका कायम आहे. आतापर्यंत करोनातून 3 कोटी 2 लाख 27 हजार 792 रुग्ण बरे झाले आहेत.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *