देशनवी दिल्ली

महाविद्यालये 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार: युजीसीच्या गाइडलाइन्स जाहीर

देशातील महाविद्यालये 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रिया आणि प्रवेशांसंदर्भात गाइडलाइन्स दिल्या आहेत. त्यानुसार 2021-22 या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

‘यूजीसी’चे सचिव रजनीश जैन यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन बनवलेल्या या गाइडलाइन्स सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पाठवल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत.

 प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण कराव्यात.

रिक्त जागांवरील प्रवेश पूर्ण करण्याचा शेवटचा दिनांक 31 ऑक्टोबर असेल. परीक्षांसाठी आवश्यक कागदपत्रेही 31 डिसेंबरपर्यंत घेण्यात यावीत.
 प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र 1 ऑक्टोबरपासून सुरू करावे.
 चालू 2020-21 शैक्षणिक वर्षातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा ऑफलाइन/ऑनलाइन किंवा दोन्ही पद्धतीने 31 ऑगस्टपर्यंत कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करून घ्याव्यात.
 बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या निकालांना विलंब झाल्यास शैक्षणिक सत्र 18 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन करावे.
 लॉकडाऊन आणि संबंधित कारणास्तव पालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या परिस्थितीत त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले किंवा अन्यत्र स्थलांतर केले तर त्यांची भरलेली फी परत करण्याची कार्यवाही 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी.
 ऑनलाइन/ऑफलाइन किंवा दोन्ही प्रकारे वर्ग घ्यावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *