बीड

बीड जिल्ह्यात आज 181 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 7761बाधीत

बीड जिल्ह्यात आज दि 17 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4818 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 181 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4637 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 8 आष्टी 52 बीड 26 धारूर 7 गेवराई 16 केज 15 माजलगाव 8 पाटोदा 16 शिरूर 16 वडवणी 17 असे रुग्ण आढळून आले आहेत

२४ तासांत राज्यात ७ हजार ७६१ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई: राज्यात गेल्या २४ तासांत एकूण ७ हजार ७६१ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले असून कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्येत किंचित घट झाल्याचे दिसत आहे. काल ८ हजार ०१० रुग्णांचे निदान झाले होते. तर, आज एकूण १३ हजार ४५२ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आज एकूण १६७ रुग्णांनी प्राण गमावले आहेत.
आजच्या १६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख ६५ हजार ६४४ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२७ टक्के एवढे झाले आहे.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ०१ हजार ३३७ इतकी झाली आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *