टेस्ट ट्युब बेबी तंत्रज्ञानातील चमत्कार:सौ.के.एस.के.हॉस्पिटल & टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या प्रयत्नातून अनेकांचे स्वप्न साकार
मागील पाच- सहा वर्षात बीडच्या वैद्यकीय क्षेत्रात अमुलाग्र असा बदल झाला आहे. पुर्वी ज्या उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरात जावे लागे ते त्या उपचाराच्या सोय- सुविधा, तंत्रज्ञान व अत्याधुनिक यंत्रसामुग्री बीडमध्ये उपलब्ध झाली आहे. बीडच्या वैद्यकिय क्षेत्राला समृध्द करण्यात स्व. केशरबाई क्षीरसागर मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटलचा सिंहाचा वाटा आहे,आई आणि वडील होण्याचे स्वप्न प्रत्येक दाम्पत्यात असते ते प्रत्यक्ष साकार करण्यासाठी डॉ सारिका क्षीरसागर यांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे
निसंतान दाम्पत्यांना टेस्ट ट्युब बेबी सारख्या अधुनिक तंत्रज्ञानाच्या उपचारासाठी पुर्वी मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा शहरात जावे लागत असे. मोठ्या शहरातील महागडे उपचार ग्रामीण भागातील सर्वसामान्य रूग्णांच्या ऐपतीबाहेरचे होते. यात पैसे आणि वेळेचाही अपव्यय होत होता. सामान्य रूग्णांची ही अडचण लक्षात घेऊन डॉ. सारीका योगेश क्षीरसागर यांनी बीडमध्ये अत्याधुनिक उपचार आणि यंत्रसामुग्रीने सुसज्ज असलेले ‘टेस्ट ट्युब बेबी’ चे पहिले सेंटर स्व. केशरबाई क्षीरसागर मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटलमध्ये सुरू केले… बीडमध्ये नव्याने आलेल्या या तंत्रज्ञानाचा शेकडो निसंतान दाम्पत्यांनी लाभ घेतला… ज्या दाम्पत्यांना दुरच्या मोठ्या शहरात जाऊन उपचार घेणे अशक्य होते त्यांच्यासाठी डॉ. सारीका योगेश क्षीरसागर यांनी सुरू केलेले ‘टेस्ट ट्युब बेबी सेंटर’ एकप्रकारे वरदान ठरले. ईतर उपचार घेऊन निराश झालेल्या कितीतरी निसंतान दाम्पत्यांना स्व. केशरबाई क्षीरसागर मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटलमधील ‘टेस्ट ट्युब बेबी’ तंत्रज्ञानाच्या उपचारानंतर अपत्यप्राप्ती झाली. एका अपत्यासाठी वर्षानुवर्ष उपचार घेत असलेल्या काही दाम्पत्यांच्या घरात जुळ्या बाळांचे आगमन झाले. लग्नाच्या तब्बल 15 ते 20 वर्षानंतर एखाद्या कुटुंबात चिमुकल्या बाळाचे आगमन झाल्यानंतर त्या कुटुंबाला होणारा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. अशा शब्दात न मावणारा आनंद डॉ. सारीका योगेश क्षीरसागर नावाच्या वैद्यकीय क्षेत्रातील नवदुर्गेने ‘टेस्ट ट्युब बेबी’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक निसंतान दाम्पत्यांना दिला आहे.
.निसंतान दाम्पत्यांच्या चेहर्यावर फुलवला आपत्यप्राप्तीचा आनंद
लग्नानंतर चार- दोन वर्षात घरात चिमुकल्या बाळाचे आगमन व्हावे, नटखट बाल लिलांनी घरातील वातावरण बहरून जावे असे प्रत्येक नवदाम्पत्य आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी वाटत असते… विवाहानंतर पाच- सहा वर्षे लोटूनही अपत्य न झाल्यास घराला सुतकी अवकळा येते… अशा वेळी महिलेला दोषी बनवून दुषने दिली जातात… उपचारसाठी रूग्णालयाचे खेटे सुरू होतात… असे उपचार घेऊन थकलेल्या… प्रचंड निराशा आलेल्या दाम्पत्यांना लग्णानंतर तब्बल 15 ते 20 वर्षांनी स्व. केशरबाई क्षीरसागर मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटलमधील ‘टेस्ट ट्युब बेबी’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अपत्यप्राप्ती झाली… अनेक निसंतान दाम्पत्याच्या निराश चेहर्यावर अपत्य प्राप्तीचा आनंद फुलवण्यात वैद्यकीय क्षेत्रातील नवदुर्गा असलेल्या डॉ. सारीका योगेश क्षीरसागर यांना यश आले आहे.
रूग्णांच्या अशिर्वादाने वाढला नावलौकीक..
क्षेत्र कोणतेही असो… निखळ, स्वच्छ व शुध्द हेतू, प्रमाणिकपणा, सेवाभाव, उच्च ज्ञान, अत्याधुनिक सोय- सुविधा हे सारे असेल तर लोकांचा विश्वास जिंकालया वेळ लागत नाही… अत्याधुनिक टेस्ट ट्युब बेबी तंत्रज्ञान, सर्वोत्तम सुविधा आणि वैद्यकीय क्षेत्रातील उच्च ज्ञानामुळे अतिषय अल्पावधीत स्व. केशरबाई क्षीरसागर मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटलने येणार्या प्रत्येक रूग्णाचा विश्वास मिळवला… यामुळे केवळ बीड जिल्हाच नव्हे तर लातूर, औरंगाबाद, नांदेड अशा वैद्यकीय क्षेत्रातील खुप सोय- सुविधा असलेल्या मोठ्या शहरातील निसंतान दाम्पत्य बीड येथील स्व. केशरबाई क्षीरसागर मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटलमधील ‘टेस्ट ट्युब बेबी’ सेंटरमध्ये उपचारासाठी येतात… यशस्वी उपचारानंतर भरभरूण अशिर्वाद देतात… या अशिर्वादाच्या बळावरच डॉ. सारीका योगेश क्षीरसागर या नवदुर्गेने ‘टेस्ट ट्युब बेबी’ तंत्रज्ञानात मराठवाड्यातील प्रसिध्द स्त्री रोग तज्ञ म्हणून अतिशय कमी कालावधीत नावलौकीक मिळवला आहे.
दि.19 जुलै ते 25 जुलै आरोग्य सप्ताहरुग्णांची होणार मोफत तपासणी तसेच उपचारामध्ये मिळणार 25 टक्के सूटदि.19 जुलै ते 25 जुलै दरम्यान के.एस.के.हॉस्पिटल & टेस्ट ट्युब बेबी सेंटरच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी तसेच उपचारामध्ये 25 टक्के सूट देण्यात येणार असून रुग्णांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.