महाराष्ट्रमुंबई

निर्बंध “जैसे थे’, करोनाच्या नियमांमध्ये शिथिलता नाही:दोन डोस घेतलेल्यांनाच देणार महाराष्ट्रात ‘एंट्री’

मुंबई – राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. यामुळे राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाही. जे नियम सध्या लागून आहे ते तसेच राहणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत निर्बंध शिथिल करण्यावर चर्चा करण्यात आली. निर्बंध शिथिल केले जाईल अशी शक्‍यता होती, पण “जैसे थे’च परिस्थिती ठेवण्यावरच सरकारला कल पाहण्यास मिळाला आहे.

राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या देशाच्या तुलनेत कमी आहे. गेल्या 3 आठवड्यात रुग्ण संख्या स्थिर आहे. पण 10 जिल्ह्यांमध्ये 92 टक्के रुग्ण आहे. त्यामुळे लेव्हल-3 मध्ये अनेक जिल्हे आहे. त्यामुळे राज्यात निर्बंध शिथिल करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

तसेच, ज्या व्यापाऱ्यांनी लशीचे दोन डोस घेतले आहे. त्यांनी दुकाने खुले ठेवण्याबाबत मागणी केली होती. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांमध्ये निर्णय घेणार आहे,

असेही त्यांनी सांगितले. करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र नागरिकांनी मोठ्या प्रमाणाक गर्दी करायला सुरुवात केली आहे.

तज्ज्ञांनी करोना साथीच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिल्यानंतरही लोक खबरदारी घेत नसल्याचे दिसून येत आहे. राज्यांनी घातलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर लोक पर्यटनस्थळे आणि बाजारपेठेत मोठी गर्दी करत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर करोना नियमांचे पालन होत नसेल तर तर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिल्या आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली.

दोन डोस घेतलेल्यांनाच देणार महाराष्ट्रात ‘एंट्री’

आधी महाराष्ट्रात येणाऱ्यांकडून आरटीपीसीआर चाचणीचं सर्टिफिकेट घेतलं जातं. मात्र, आता या पुढे ज्यांनी कोरोनाच्या दोन लस घेतल्या असतील आणि ज्यांच्याकडे तसे सर्टिफिकेट असेल त्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे, असं टोपे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *