बीड

बीड जिल्ह्यात आज 157 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 8 हजारच्या तर देशात 41 हजाराच्या पुढे बाधीत

बीड जिल्ह्यात आज दि 11 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3915 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 157 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3758 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 6 आष्टी 33 बीड 34 धारूर 5 गेवराई 23 केज 14 माजलगाव 2 परळी 3 पाटोदा 20 शिरूर 7 वडवणी 10 असे रुग्ण आढळून आले आहेत

गेल्या २४ तासांत राज्यात ८ हजार २९६ नवीन रुग्ण

मुंबई: राज्यात गेल्या २४ तासात एकूण ८ हजार २९६ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच आज नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या काहीशी घटली आहे.तर एकूण ६ हजार ०२६ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच एकूण १७९ रुग्णांनी प्राण गमावेल आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. (maharashtra registered 8296 new cases in a day with 6026 patients recovered and 179 deaths today)
कालच्या १७९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख ०६ हजार ४६६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०५ टक्के एवढे झाले आहे.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १४ हजार इतकी झाली आहे.

देशात 41 हजार 506 नवीन कोरोना रुग्ण

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 41 हजार 506 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. याच कालावधीत देशात 41 हजार 526 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 895 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून देशातील कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे. 35 हजारांखाली आलेली नवीन कोरोना रुग्णसंख्या पुन्हा 45 हजारांच्या पुढे गेली होती.
देशाचा सध्याचा रिकव्हरी रेट 97.20 टक्के इतका आहे. भारताचा पॉझिटिव्हिटी रेटही मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. भारताचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 2.32 टक्के इतका आहे. देशाचा सध्याचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्केंपेक्षा कमी आहे. सलग विसाव्या दिवशी देशाचा दररोजचा पॉझिटिव्हिटी रेट तीन टकक्केंपेक्षा कमी आहे. देशाचा शनिवारचा पॉझिटिव्हिटी रेट 2.25 टक्के इतका होता.

देशातील सध्याची कोरोना स्थिती –

एकूण कोरोनाबाधित रुग्ण – 3.08 कोटी

उपचाराधीन रुग्ण – Total active cases: 4,54,118

एकूण कोरोनामुक्त Total discharges: 2,99,75,064

एकूण मृत्यू – Death toll: 4,08,040

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *