बीड

बीड जिल्ह्यात आज 188 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 9 हजार बाधीत तर देशात मृत्यू संख्येत वाढ

बीड जिल्ह्यात आज दि 10 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4085 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 188 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3897 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 6 आष्टी 81 बीड 30 धारूर 6 गेवराई 21 केज 15 माजलगाव 2 पाटोदा 17 शिरूर 5 वडवणी 5 असे रुग्ण आढळून आले आहेत

गेल्या २४ तासांत राज्यात ८ हजार ९९२ नव्या करोनाबाधितांची नोंद

गेल्या २४ तासांच्या आकडेवारीनुसार राज्यात तब्बल २०० मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.०३ टक्के इतका झाला आहे. राज्यात आजपर्यंत करोना मुळे झालेल्या मृतांचा आकडा आता १ लाख २५ हजार ०३४ इतका झाला आहे. यामध्ये सर्वाधिक १५ हजार ५९९ मृत्यू हे एकट्या मुंबई महानगर पालिका क्षेत्रामध्ये झाले आहेत.

एकीकडे मृतांचा आकडा वाढलेला असताना दुसरीकडे राज्यात नव्याने सापडणाऱ्या करोना बाधितांचा आकडा मात्र अजूनही १० हजारांच्या खालीच आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८ हजार ९९२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत सापडलेल्या करोनाबाधितांची संख्या ६१ लाख ४० हजार ९६८ वर गेली आहे.

दरम्यान, राज्यातल्या आजपर्यंतच्या एकूण करोनाबाधितांपैकी ५९ लाख ४४० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज दिवसभरात १० हजार ४५८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९६.०८ टक्क्यांवर पोहोचला आहे. आजघडीला राज्यात १ लाख १२ हजार २३१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Covid19: करोना मृत्यूंच्या संख्येत वाढ,देशात एका दिवसात १२०६ मृत्यू

नवी दिल्ली : आज (शनिवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात शुक्रवारी (९ जून २०२१) ४२ हजार ७६६ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०७ लाख ९५ हजार ७१६ वर पोहचलीय. देशात सध्या ४ लाख ५५ हजार ०३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे १२०६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख ०७ हजार १४५ वर पोहचलीय.
शुक्रवारी ४५ हजार २५४ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. त्यामुळे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ९९ लाख ३३ हजार ५३८ वर पोहचलीय.
एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : ३ कोटी ०७ लाख ९५ हजार ७१६
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ९९ लाख ३३ हजार ५३८
उपचार सुरू : ४ लाख ५५ हजार ०३३
एकूण मृत्यू : ४ लाख ०७ हजार १४५

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *