महाराष्ट्रमुंबई

इंधन दरवाढीचा फटका:लालपरीचा प्रवास महागणार

मुंबई – महागाईने आधिच हताश झालेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झड बसणार आहे. एसटीची भाडेवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. ही भाडेवाढ डिझेल दरवाढी मुळे करण्यात येणार असल्याचे एसटी कडून सांगण्यात आले आहे. यासंदर्भात एसटीकडून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

करोनामुळे आधिच पूर्ण क्षमतेने एसटीची सेवा सुरु नाही. तसेच लॉकडाऊनचे निर्बंध असल्याने अनेक मार्गावरील गाड्या बंद आहेत. हा भार असताना डिझेलच्या सतत होणाऱ्या दरवाढीमुळे एसटीवर महिन्याला सुमारे 120 ते 140 कोटींचा अतिरिक्त भार पडला आहे. त्यामुळे एसटीने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने भाडेवाढीचा हा प्रस्ताव तयार केला आहे.

याआधी जून 2018 मध्ये एसटीने 18 टक्के भाडेवाढ केली होती. आता पुन्हा ही भाडेवाढ होणार असल्याने तिकीट दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.एसटी महामंडळाच्या 15 ते 16 हजार बस डिझेलवर धावत आहेत. पूर्ण क्षमतेने एसटी धावतात तेव्हा राज्यभरात दिवसाला एसटीला 12 लाख 500 लीटर डिझेल लागते. सध्या महामंडळाच्या 10 हजार गाड्या धावत आहेत.त्यासाठी 8 लाख लीटर डिझेल एसटीला दिवसाकाठी लागते. तसेच एसटीच्या एकूण महसुलाच्या 38 टक्के म्हणजेच 3 ते 4 हजार कोटी रुपये फक्‍त इंधनावर खर्च होतात, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *