बीड

बीड जिल्ह्यात आज 152 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात आणि देशात पुन्हा रूग्णवाढ

बीड जिल्ह्यात आज दि 9 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3883 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 152 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3731 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 2 आष्टी 41 बीड 27 धारूर 6 गेवराई 10 केज 14 माजलगाव 7 परळी 2 पाटोदा 21 शिरूर 15 वडवणी 7 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात ९,११४ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई : महाराष्ट्रात आज ८,८१५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ५८,७२,२६८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.०६ % एवढे झाले आहे.

आज राज्यात ९,११४ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज १२१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०२ % एवढा आहे.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण –

राज्यात आज रोजी एकूण १,१४,४४४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

देशात ४३ हजार ३९३ नवीन करोनाबाधित

देशातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत असले, तरी देखील अद्यापही दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या व करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत भर पडतच आहे. दररोज समोर येणारी देशभरातील करोनाबाधितांची संख्या ही कधी करोनामुक्त झालेल्यांपेक्षा जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. तर, रूग्णांच्या मृत्यू संख्येत वाढ सुरूच आहे. मागील २४ तासात देशभरात ४४ हजार ४५९ रूग्ण करोनातू बरे झाले असून, ४३ हजार ३९३ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, देशात ९११ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.

याचबरोबर देशातील एकूण बाधितांची संख्या ३,०७,५२,९५० झाली आहे.

आजपर्यंत देशात २,९८,८८,२८४ जण करोनातून बरे झाले आहेत. तर ४,०५,९३९ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. देशातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ४,५८,७२७ आहे. आजपर्यंत देशात ३६,८९,९१,२२२ जणांचे लसीकरण झालेले आहे. यापैकी ४०,२३,१७३ जणांचे मागील २४ तासात लसीकरण झालेले आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *