बीड

बीड जिल्ह्यात आज 148 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात आणि देशातही रूग्णवाढ

बीड जिल्ह्यात आज दि 8 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4055 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 148 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3907 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 5 आष्टी 46 बीड 16 धारूर 6 गेवराई 35 केज 16 माजलगाव 2 परळी 1 पाटोदा 12 शिरूर 7 वडवणी 2 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत आजही वाढ

मुंबई: राज्यात कालच्या तुलनेत काल करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत काहीशी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात एकूण ९ हजार ५५८ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर मंगळवारी ही संख्या ८,४१८ इतकी होती. तसेच काल नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही घटली आहे. एकूण ८ हजार ८९९ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण १० हजार ५४८ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. तसेच, मृत्यूची संख्या घटली असून काल १४७ रुग्णांनी प्राण गमावले आहेत. मंगळवारी ही संख्या १७१ इतकी नोंदवली गेली होती. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. (maharashtra registered 9558 new cases in a day with 8899 patients recovered and 147 deaths today)
कालच्या १४७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०२ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५८ लाख ८१ हजार १६७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०५ टक्के एवढे झाले आहे.

बुधवारी देशात ४५ हजार ८९२ करोनाबाधित रुग्ण आढळले

नवी दिल्ली : आज (गुरुवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात बुधवारी (७ जून २०२१) ४५ हजार ८९२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०७ लाख ०९ हजार ५५७ वर पोहचलीय. देशात सध्या ४ लाख ६० हजार ७०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे ८१७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख ०५ हजार ०२८ वर पोहचलीय.
बुधवारी ४४ हजार २९१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. त्यामुळे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ९८ लाख ४३ हजार ८२५ वर पोहचलीय.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील अॅक्टिव्ह रुग्णांचा दर १.५० टक्के आहे. रिकव्हरी दरात वाढ होऊन हा दर ९७.१८ टक्क्यांवर पोहचलाय. देशात आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या २.३७ टक्के आहे तर दैनिक पॉझिटिव्हिटी रेट २.४२ टक्क्यांवर आहे. सलग १७ व्या दिवशी दैनिक पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्क्यांच्या खाली असल्याचं दिसून येतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *