बीड

आज बीड जिल्ह्यात रूग्णवाढ; 188 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यातही रूग्णवाढ

बीड जिल्ह्यात आज दि 7 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3842 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 188 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3654 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 13 आष्टी 46 बीड 31 धारूर 7 गेवराई 45 केज 10 माजलगाव 6 परळी 2 पाटोदा 21 शिरूर 6 वडवणी 1असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात रुग्णसंख्येत काहीशी वाढ

मुंबई: राज्यात रुग्णसंख्येत काहीशी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. तसेच मृत्यूंच्या संख्येतही कालच्या तुलनेत वाढ दिसत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात एकूण ८ हजार ४१८ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर,काल एकूण १० हजार ५४८ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, दिवसभरात फक्त १७१ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या १७१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०२ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५८ लाख ७२ हजार २६८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०६ टक्के एवढे झाले आहे.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १४ हजार २९७ इतकी झाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *