दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन
बॉलिवूडचे दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे ते 98 वर्षाचे होते. आज सकाळी 7.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होती. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. 29 जून रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर आज त्यांचे निधन झाले.
दिलीप कुमार यांचे खरं नाव मोहम्मद युसूफ खान होते. त्यांचा जन्म 11 डिसेंबर पेशावरमध्ये झाला होता. दिलीप कुमार बॉलिवूडचे पहिले खान समजले जातात.
दिलीप कुमार यांनी 1944 साली आलेल्या ज्वार भाटा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
दिलीप कुमार यांनी 50 वर्षाच्या कारकीर्दीत 65 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. त्यात अंदाज, आन, दाग, देवदास, आजादात, मुघले ए आझम गंगा जमुना, राम और श्याम सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
1976 साली दिलीप कुमार यांनी पाच वर्षांसाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर 1981 साली आलेल्या क्रांति चित्रपटातून त्यांनी पुनरागमन केले. नंतर शक्ती, मशाल, करमा, सौदागर या चित्रपटात काम केले. 1998 साली किला हा चित्रपट त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.