बीड

बीड जिल्ह्यात 132 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात आणि देशात पहा रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 6 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3218 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 132 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3086 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 6 आष्टी 38 बीड 19 धारूर 2 गेवराई 24 केज 8 माजलगाव 9 परळी 3 पाटोदा 8 शिरूर 9 वडवणी 6 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्येत वाढ-घट कायम होती. महाराष्ट्रात दररोज 9 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडत होते. मात्र आज कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. राज्यात आज (5 जुलै) दिवसभरात 6 हजार 740 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. (in maharashtra today 5 july 2021 6 thousand 740 corona patients found)  
राज्यात आज एकूण 13 हजार 27 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. तर आतापर्यंत एकूण 58 लाख 61 हजार 720 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केलीय. त्यामुळे राज्यामधील रुग्ण बरे होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट (Recovery Rate) हा 96.02%  इतका झालाय.     

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत पाच हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 34 हजार 703 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर सक्रिय कोरोनाग्रस्तांची संख्या ( 4 लाख 64 हजार 357) गेल्या 111 दिवसांतील निचांकी ठरली आहे. एका दिवसात 553 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट होत आहे, तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

गेल्या 24 तासात भारतात 34 हजार 703 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 553 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 51 हजार 864 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *