पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते इय़त्ता बारावीचे वर्ग सुरू होणार
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रातील पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते इय़त्ता बारावीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना आज(सोमवार) राज्य शासनाकडून काढण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कोविडमुक्त भागाती इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने आज एक महत्वपूर्ण निर्णय़ घेतलेला आहे. राज्य शासनाने यासंदर्भात एक परिपत्रक काढून शासन निर्णय जाहीर केला असून, करोनामुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठरावने शासन निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या संदर्भात राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, ग्रामीण भागात कोविडमुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या गावातील शाळेतील इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरू करणेबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा, शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे, करोना संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, संबंधीत शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.
तसेच, कोविडमुक्त गावातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार, पालकांशी चर्चा करून ग्रामपंचायतीला ठराव आणावा लागेल. एका बाकावर एक विद्यार्थी तर दोन बाकांमध्ये सहा फूटांचे अंतर ठेवावे लागणार. एक वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थ्यांना बसण्यास परवानगी असणार, करोना संदर्भात कोणतीही लक्षणे आढल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठण्यात येईल. त्यांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य असेल. असेही सूचित करण्यात आलेले आहे.