बीड

बीड जिल्ह्यात 159 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात आणि देशात पहा रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 4 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3870 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 159 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3711 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 2 आष्टी 24 बीड 28 धारूर 21 गेवराई 14 केज 7 माजलगाव 4 परळी 2 पाटोदा 41 शिरूर 8 वडवणी 8 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात ९ हजार ४८९ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई: राज्यात गेल्या २४ तासात एकूण ९ हजार ४८९ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर, आज एकूण ८ हजार ३९५ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, आज दिवसभरात १५३ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या १५३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५८ लाख ४५ हजार ३१५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के एवढे झाले आहे.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १७ हजार ५७५ इतकी झाली आहे.

देशात एका दिवसात आढळले ४४,१११ करोनाबाधित

नवी दिल्ली : शनिवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात शुक्रवारी (२ जुलै २०२१) ४४ हजार १११ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०५ लाख ०२ हजार ३६२ वर पोहचलीय. देशात सध्या ४ लाख ९५ हजार ५३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे ७३८ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख ०१ हजार ०५० वर पोहचलीय.
शुक्रवारी ५७ हजार ४७७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. त्यामुळे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ९६ लाख ०५ हजार ७७९ वर पोहचलीय.
भारतात तब्बल ९७ दिवसानंतर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पाच लाखांहून कमी झाल्याचं समोर येतंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील अॅक्टिव्ह रुग्णांचा दर १.६२ टक्के आहे. रिकव्हरी रेट वाढून ९७.०६ टक्क्यांवर तर दैनिक पॉझिटिव्हिटी रेट २.३५ टक्के आहे.
एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : ३ कोटी ०५ लाख ०२ हजार ३६२
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ९६ लाख ०५ हजार ७७९
उपचार सुरू : ४ लाख ९५ हजार ५३३
एकूण मृत्यू : ४ लाख ०१ हजार ०५०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *