बीड जिल्ह्यात 120 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 8,753 नवीन रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 3 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3852 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 120 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3732 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 5 आष्टी 33 बीड 14 धारूर 7 गेवराई 16 केज 6 माजलगाव 6 परळी 8 पाटोदा 8 शिरूर 7 वडवणी 10 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात 8,753 नवीन रुग्णांची नोंद
मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात काल 8,385 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला तर 8,753 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह केसेस एक लाख 16 हजारांच्या जवळ आल्या आहेत.
राज्यात काल 9, 195 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती तर 8,634 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
आजपर्यंत 58,36,920 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96.01 टक्क्यांवर गेला आहे.तर राज्यात काल 156 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2. 01 टक्के आहे. राज्यात सध्या 1,16,867 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.