बीड

बीड जिल्ह्यात 111 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 9195 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 2 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3189 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 111 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3078 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 17 बीड 14 धारूर 5 गेवराई 8 केज 9 माजलगाव 3 परळी 6 पाटोदा 30 शिरूर 8 वडवणी 7 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात आज ९ हजार १९५ नवे रुग्ण तर ८ हजार ६३४ रुग्ण बरे

मुंबई: राज्यातील करोना संसर्गाचा ग्राफ खाली आला असला तरी दैनंदिन आकडेवारीतील चढ उतार कायम आहे. आज बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत नवीन बाधितांची संख्या अधिक राहिली. दिवसभरात ९ हजार १९५ नवीन रुग्णांची भर पडली तर त्याचवेळी ८ हजार ६३४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले.

राज्यात नवीन करोना बाधितांची संख्या अपेक्षित प्रमाणात अजून कमी होत नसली तरी अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १ लाख १६ हजारांपर्यंत घटली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ९६ टक्क्यांच्यावर गेले आहे.

अशी आहे करोनाची राज्यातील आजची स्थिती:

  • राज्यात आज २५२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.०१ टक्के एवढा.
  • आज राज्यात ९ हजार १९५ नवीन रुग्णांचे निदान.
  • दिवसभरात ८ हजार ६३४ रुग्ण बरे होऊन परतले घरी
  • आजपर्यंत एकूण ५८,२८,५३५ करोना बाधित रुग्ण झाले बरे.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६.०१ टक्के एवढे.
  • राज्यात सध्या करोनाचे १ लाख १६ हजार ६६७ ॲक्टिव्ह रुग्ण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *