बीड

बीड जिल्ह्यात 103 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 9771कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 1 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3858 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 103 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3755 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 21 बीड 11 धारूर 11 गेवराई 15 केज 7 माजलगाव 6 परळी 2 पाटोदा 17 शिरूर 4 वडवणी 5 असे रुग्ण आढळून आले आहेत

गेल्या २४ तासांत राज्यात ९ हजार ७७१ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई: राज्यात गेल्या २४ तासात एकूण ९ हजार ७७१ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर, आज एकूण १० हजार ३५३ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, आज दिवसभरात १४१ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे आज नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

आजच्या १४१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५८ लाख १९ हजार ९०१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०२ टक्क्यांवर पोहोचले आहे.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १६ हजार ३६४ इतकी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *