बीड जिल्ह्यात 173 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 8 तर देशात 37 हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 30 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3979 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 173 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3806 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 8 आष्टी 52 बीड 22 धारूर 7 गेवराई 17 केज 15 माजलगाव 9 परळी 3 पाटोदा 15 शिरूर 15 वडवणी 10 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात गेल्या 24 तासात एकूण 8 हजार 085 नव्या कोरोना बाधित रुग्णांचे निदान
राज्यात गेल्या 24 तासात एकूण 8 हजार 085 नव्या कोरोना बाधित रुग्णांचे निदान (Maharashtra Registered 8085 New Cases) झाले आहे. तर आज एकूण 8 हजार 623 इतके रुग्ण बरे (patients recover) होऊन घरी गेले आहेत. तसेच आज दिवसभरात 231 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू (death) झाला आहे.
आजपर्यंत 1 लाख 21 हजार 804 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण (Case Fatality Rate) 2.01 टक्के आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 58 लाख 09 हजार 548 इतकी झाली आहे.
राज्यात सध्या 1 लाख 17 हजार 098 सक्रीय रुग्ण (Active patient) आहेत.
देशातील नव्या करोनाबाधितांची संख्या घटली
नवी दिल्ली – देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या आता चाळीस हजारांच्याही खाली आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या 24 तासांत करोनाचे 37 हजार 566 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
मृतांचा आकडाही एक हजाराच्या आत आला असून, देशात गेल्या 24 तासांत 907 करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 3 लाख 97 हजार 637 इतकी झाली आहे.
दरम्यान, काल दिवसभरात देशात देण्यात आलेल्या नव्या करोना लस डोसमुळे लस देण्यात आलेल्या नागरिकांची एकूण संख्या आता 32 कोटी 90 लाख इतकी झाली आहे. सध्या देशातील करोनाच्या सक्रिय बाधितांची संख्या 5 लाख 52 हजार 659 इतकी आहे. देशाचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 2.74 टक्के इतका झाला आहे.