कोरोनामुळे पालकांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची संपूर्ण फी माफ
कोरोनामुळे पालकांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची संपूर्ण फी माफ करण्यात आल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज केली. त्याचप्रमाणे विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना आकारण्यात येणारे इतर शुल्कही पूर्णपणे माफ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाची लागण झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आपले पालक गमावले. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांसमोर शिक्षण कसे घ्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. त्यांच्या पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची संपूर्ण फी माफ करण्यात आल्याचे उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालये
जिमखाना, विविध उपक्रम, कॉलेज मॅगझिन, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी, यूथ फेस्टिव्हल शुल्क माफ
प्रयोगशाळा व ग्रंथालय यांची देखभाल तसेच ग्रंथालयामध्ये ई-कन्टेन्ट विकत घेण्यासाठी
खर्च करण्यात आला
असल्याने शुल्कामध्ये 50 टक्के सवलत
वसतिगृह शुल्क पूर्णपणे माफ
विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये
शिक्षण शुल्क व विकास निधीमध्ये सवलत
जिमखाना शुल्क, विविध उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगझिन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी
यूथ फेस्टिव्हल शुल्क पूर्णपणे माफ
प्रयोगशाळा व ग्रंथालय शुल्कात 50 टक्के सूट