बीड जिल्ह्यात आज 129 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यातही रुग्णसंख्या 10 हजाराच्या घरात
बीड जिल्ह्यात आज दि 28 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3626 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 129 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3497 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 5 आष्टी 30 बीड 8 धारूर 14 गेवराई 10 केज 4 माजलगाव 4 परळी 5,पाटोदा 36 शिरूर 8 वडवणी 5 असे रुग्ण आढळून आले आहेत.
महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा १० हजारांच्या जवळ
मुंबई : करोनाची दुसरी लाट ओसल्यानंतर राज्यातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटली. त्यामुळे शासनाकडून अनलॉक प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुन्हा गर्दी वाढू लागल्याने गेल्या काही दिवसांपासून राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या १० हजारांच्या आसपास आढळत आहे. राज्यात काल रविवारी ९ हजार ९७४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसंच १४३ जणांनी या आजारामुळे आपले प्राण गमावले आहेत.
रविवारी ८,५६२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५७,९०,११३ करोनाबाधित रुग्ण या आजाराला हरवून बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.९१ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २ टक्के एवढा आहे.
राज्यात आज रोजी एकूण १,२२,२५२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.