बीड

बीड जिल्ह्यात आज 131 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यातही रुग्ण संख्या घटली

बीड जिल्ह्यात आज दि 27 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 5200 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 131 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 5061 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 9 आष्टी 33 बीड 30 धारूर 7 गेवराई 17 केज 3 माजलगाव 3 पाटोदा 13,परळी 4 शिरूर 5 वडवणी 7 असे रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात काल दिवसभरात ९ हजार ८१२ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई: राज्यात नवीन करोना बाधित रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी राहिले. काल दिवसभरात ९ हजार ८१२ नवीन रुग्णांची राज्यात भर पडली तर त्याचवेळी ८ हजार ७५२ रुग्ण करोनावर मात करून रुग्णालयातून घरी परतले. करोनाच्या विळख्यात सापडलेले आणखी १७९ रुग्ण दगावले असून आतापर्यंत या संसर्गाने १ लाख २० हजार ८८१ रुग्णांचा राज्यात बळी घेतला आहे. दरम्यान, राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आता १ लाख २१ हजार २५१ पर्यंत खाली आली आहे.

राज्यातील आजची करोना स्थिती

  • आज १७९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.० टक्के एवढा.
  • राज्यात २४ तासांत ९ हजार ८१२ नवीन रुग्णांचे निदान.
  • दिवसभरात ८ हजार ७५२ रुग्ण बरे होऊन घरी
  • आजपर्यंत एकूण ५७,८१,५५१ रुग्णांची करोनावर मात.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.९३ टक्क्यांवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *