बीड

बीड जिल्ह्यात सांयकाळी 5 नंतर कडक संचारबंदी:विकेंड लॉकडाऊन कायम

बीड जिल्ह्यात कोविड-19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून या कार्यालयाचे आदेश क्र.14 अन्वये बीड जिल्ह्यात दिनांक 15/06/2021 रोजी पर्यंत निबंध वाढविण्यात आलेले होते. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांचेकडील No. DMU/2020/CR.92/DisM-1, दिनांक
04/06/2021 रोजीच्या संदर्भ क्र.15 च्या आदेशान्वये राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता निबंधाच्या कालावधी मध्ये राज्यातील वेगवेगळ्या विभागातील कोव्हीड-19 ची परिस्थिती लक्षात घेता राज्यात कोरोना मुळे लावण्यात आलेल्या निबंधांवर शिथीलता येत असून राज्य सरकारने लॉकडाऊन शिथील करण्यासाठी 5 स्तर ठरविले आहेत. त्या त्या स्तरानुसार संबधित जिल्हयांमध्ये निबंध शिथील करण्यात आलेले आहेत.
ज्या अर्थी संदर्भ क्र.15 च्या मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून साथरोग प्रतिबंध कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार राज्य शासनाने वर्गीकरण केलेले आहे व संदर्भ क्र.21 च्या मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांच्या आदेशानुसार साप्ताहिक पॉझिटिव्हीटी रेट हा आरटी-पीसीआर तपासणीवरुन करणेबाबत आदेशित केले आहे.
आणि ज्याअर्थी, जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन प्राप्त अहवालानुसार बीड जिल्हयामध्ये कोविड बाधित रुग्णांचा साप्ताहिक आरटी-पीसीआर पॉझिटिव्हीटी रेट 6.54% असुन व्यापलेल्या ऑक्सीजन बेडसची टक्केवारी 9.58% असल्याने बीड जिल्हा महाराष्ट्र शासनाचे संदर्भ क्र. 15 व 21 अन्वये घोषित करण्यात आलेल्या निर्देशानुसार तिसऱ्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहे.

त्या अर्थी, बीड जिल्हयात कोविड-19 संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखणेसाठी लागु असलेले या कार्यालयाचे संदर्भिय आदेश क्र 16 दिनांक 05.06.2021. मधील निर्बंध बीड जिल्हयात दिनांक 25.06.2021 रोजी पासून शासनाकडील पुढील आदेशापर्यंत लागु राहतील. तसेच महाराष्ट्र शासनाचे संदर्भ क्र. 21 मध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास संभाव्य तिसरी लाट रोखण्याच्या अनुषंगाने आवश्यक दिशानिर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने विविध यंत्रणांना खालीलप्रमाणे आदेशित करण्यात येत आहे-

  1. जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड व जिल्हा शल्य चिकित्सक, बीड यांनी नागरिकांमध्ये जागरुगता निर्माण होण्याच्या दृष्टीने कोविड-19 लसीकरणाकरिता व्यापक प्रसिध्दी करावी. लसीकरणांकरिता पात्र असलेल्या नागरिकांचे 70 टक्के लसीकरण पुर्ण करण्याच्या दृष्टीने काटेकोर नियोजन करावे व आवश्यक उपाययोजना पूर्ण कराव्यात.
  2. जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड व जिल्हा शल्य चिकित्सक, बीड रुग्ण संख्या नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने (Test-Track-Treat) या त्रिसुत्रीचा व्यापक प्रमाणात वापर करावा.
  3. सर्व मुख्याधिकारी जि. बीड व सर्व गट विकास अधिकारी, जि. बीड यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनामध्ये / खाजगी कार्यालयांमध्ये पुरेश्या प्रमाणात मोकळया जागा आहे किंवा कसे याची खातरजमा करावी सदरील ठिकाणी खेळती हवा राहण्याच्या दृष्टीने पर्याप्त उपाययोजना जसे की, HEPA Filters व
    Exhaust Fans इ.चा वापर होत असलेबाबत खात्री करावी.
  4. जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड व जिल्हा शल्य चिकित्सक, बीड यांनी जास्तीत जास्त प्रमाणात आरटी- पीसीआर तपासणींची संख्या वाढवावी.
  5. सर्व पोलीस निरिक्षक, सर्व मुख्याधिकारी, नगर पालिका / नगर पंचायत व सर्व गट विकास अधिकारी, जि. बीड यांनी सार्वजनिक स्थळी ‘कोवीड योग्य वर्तन’ ( Covid Appropriate Behaviour) चे पालन होत नसल्याचे दिसुन आल्यास संबधित व्यक्ती / संस्था / आस्थापनाधारकांकडुन नियमानुसार दंडाची रक्कम वसूल करावी.
  6. सर्व पोलीस निरिक्षक, सर्व मुख्याधिकारी, नगर पालिका / नगर पंचायत व सर्व गट विकास अधिकारी, जि. बीड यांनी ज्या कार्यक्रम / समारंभ / उपक्रमांमध्ये मोठया प्रमाणावर लोकांची गर्दी होणे, समुहांमध्ये एकत्र येणे
    इ. कार्यक्रम / समारंभ / उपक्रमांना परवानगी देण्याचे टाळावे.
  7. सर्व तहसिलदार, जि. बीड यांनी विशिष्ट भागात / गावांमध्ये मोठया प्रमाणावर रुग्ण संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आल्यास अशी ठिकाणे कंटेन्मेंट झोन (Containment Zone) म्हणून घोषित करावी जेणेकरुन लहान भागांमध्ये विशेषत: जिथे मोठया प्रमाणावर रुग्ण आढळुन येत आहेत अशा ठिकाणी निबंध लागु करता येईल व रुग्ण संख्या वाढीचा दर कमी करण्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल.
  8. सर्व तहसिलदार, सर्व पोलीस निरिक्षक, सर्व मुख्याधिकारी, नगर पालिका / नगर पंचायत व सर्व गट विकास अधिकारी, जि. बीड यांनी त्यांच्या स्तरावर फिरते पथकांची स्थापना करुन सार्वजनिक स्थळी ‘कोवीड योग्य वर्तन’ ( Covid Appropriate Behaviour) चे पालन होत आहे किंवा कसे याबाबत खातरजमा करावी
    विशेषत: नियोजित लग्न समारंभाची ठिकाणे, आणि आस्थापन जसे की, रेस्टॉरंट, मॉल्स, सुपर मार्केट इ.

सर्व नागरिकांना याद्वारे पुन:श्च आदेशित करण्यात येते की, या कार्यालयाचे आदेश दिनांक
23.06.2021 नुसार लग्न समारंभाकरिता निर्देशित केलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन नागरिकांनी करावे व विशेषत: लग्नात उपस्थित असलेल्या सर्वांची अँटीजन तपासणी करणे बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी.
सायंकाळी 05.00 वाजेनंतर जिल्हयात सर्वत्र संचारबंदी लागु असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक प्रसंगी जसे की, वैद्यकीय कारणास्तवच घराबाहेर पडावे. संचारबंदी आदेशाचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे.

सर्व रेस्टॉरंट / हॉटेल आस्थापनाधारकांनी त्यांना नेमून दिलेल्या वेळेतच (सोमवार ते शुक्रवार एकुण क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत) दुपारी 04.00 वाजेपर्यंत सुरु ठेवावे, नेमुन दिलेल्या वेळे व्यतिरिक्त जर इतर वेळी आपल्या आस्थापना चालू असल्याचे निदर्शनास आल्यास दंडात्मक व फौजदारी कार्यवाही अनुसरण्यात येईल याची नोंद घ्यावी व याबाबत पोलीस प्रशासनाने वेळोवेळी पाहणी करावी. आवश्यक सेवे व्यतिरिक्त इतर दुकाने / आस्थापना या शनिवार व रविवार पूर्णत: बंद राहतील.
सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणा आणि सर्व संबधित विभागांची राहील.असे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *