बीड

बीड जिल्ह्यात आज एकशे एकावन्न रुग्ण पॉझिटिव्ह:राज्यात 10 हजार 66 नव्या रुग्णांचे निदान

बीड जिल्ह्यात आज दि 24 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4066 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 151 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3915 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 25 बीड 25 धारूर 12 गेवराई 21 केज 28 माजलगाव 11 परळी 5 पाटोदा 10 शिरूर 6 वडवणी 7 असे रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात आज १० हजार ०६६ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई: राज्यात काल दिवसभरात नव्या रुग्णाच्या संख्येत काहीशी वाढ झाली असून गेल्या २४ तासात एकूण १० हजार ४७० नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज एकूण ११ हजार ०३२ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, आज दिवसभरात १६३ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या १६३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर १.९९ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५७ लाख ५३ हजार २९० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९३ टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख २१ हजार ८५९ इतकी झाली आहे.

देशात एका दिवसात ५० हजार ८४८ रुग्ण आढळले, १३५८ मृत्यू

नवी दिल्ली :काल सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात मंगळवारी (२२ जून २०२१) ५० हजार ८४८ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून ९६.५६ टक्क्यांवर पोहचलाय. तर दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट कालच्या दिवसापेक्षा थोडा वाढून २.६७ टक्क्यांवर पोहचल्याचं दिसतंय.
दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे १३५८ जणांचा मृत्यू नोंदविण्यात आला. मंगळवारी ६८ हजार ८१७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय.
देशात सध्या ६ लाख ४३ हजार १९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या ८२ दिवसांतला ‘अॅक्टिव्ह रुग्णांचा’ हा सर्वात कमी आकडा आहे.
देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०० लाख २८ हजार ७०९ वर पोहचलीय. देशात आत्तापर्यंत २ कोटी ८९ लाख ९४ हजार ८५५ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. तर सध्या ६ लाख ४३ हजार १९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख ९० हजार ६६० वर पोहचलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *