लग्न समारंभासाठी जिल्हाधिकारी यांचे नवे आदेश:नियमभंग करणारावर होणार कारवाई
बीड जिल्हयामध्ये कोविड बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा 7.11% असुन, व्यापलेल्या ऑक्सीजन बेड्सची टक्केवारी 11.97 % इतकी असल्याने बीड जिल्हा महाराष्ट्र शासनाचे संदर्भ क्र. 15 अन्वय घोषित करण्यात आलेल्या तिसऱ्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहे.
ज्या अर्थी बीड जिल्हयात कोविड-19 संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखणेसाठी लागु असलेले या कार्यालयाचे संदर्भिय आदेश क्र 16 दिनांक 05.06.2021 मधील निबंध बीड जिल्हयात दिनांक 18.06.2021 रोजी पासून शासनाकडील पुढील आदेशापर्यंत लागु आहेत.
आणि ज्याअर्थी, असे निर्दशनास आले की, या कार्यालयाचे संदर्भ आदेश 15 मधील अनु क्रमांक 9 मधील लग्न समारंभाकरिता स्थानिक पोलीस प्रशासनाच्या परवानगी ने 50 लोकांची परवानगी असुन देखील जिल्हयातील सर्व शहरी भागांमध्ये तसेच ग्रामीण भागात लग्न समारंभाकरिता मोठया प्रमाणावर गर्दी जमा होत असुन कोवीड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आवश्यक असेलेल्या नियमांचे काटेकोर पणे पालन होत नाही
त्या अर्थी, बीड जिल्हयात आयोजित करण्यात येणाऱ्या लग्न समारंभाकरिता पुढील प्रमाणे नियमावली लागु करण्यात येत आहे –
- सर्व प्रथम विवाह समारंभ आयोजक (वधू पक्ष असो किंवा वर पक्ष अथवा त्रयस्थांमार्फत) यांनी संबधित मंगल कार्यालय / मॅरेज हॉल / हॉटेल हॉल इ. ठिकाणी आपणास आवश्यक असलेल्या तारखेची पुर्व नोंदणी करावी.
- संबधित मंगल कार्यालय / मॅरेज हॉल / हॉटेल हॉल मालकांनी एका दिवशी केवळ एकाच विवाहास परवानगी प्रदान करावी एका पेक्षा जास्त लग्न समारंभ एकाच दिवशी आयोजित करण्यात येवु नये.
- आयोजकांना मंगल कार्यालय / मॅरेज हॉल / हॉटेल हॉल इ. नियोजित तारखेस उपलब्ध झाल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यावी.
- स्थानिक पोलीस प्रशासनाने परवानगी प्रदान करते वेळेस, उपस्थित सर्व 50 लोकांचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांकाची यादी, संबधित मंगल कार्यालय / मॅरेज हॉल / हॉटेल हॉल मालकाचे नाव, दुरध्वनी क्रमांक इ. माहिती आयोजकांकडुन घ्यावी. तसेच उपस्थित सर्वांचे अँटीजन | आरटीपीसीआर तपासणी अहवाल
Negative असेलबाबत खात्री करावी. - स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी प्राप्त होताच उपस्थित राहणारे सर्व 50 लोकांची यादी (नाव, पत्ता, संपर्क क्रमांकासह) व पोलीस प्रशासनाची परवानगी चे पत्र, संबधित मंगल कार्यालय / मॅरेज हॉल / हॉटेल हॉल मालकाचे नाव, दुरध्वनी क्रमांक इ. माहिती स्थानिक स्वराज्य संस्था उदा. ग्रामीण भागात ग्रामपंचायत व शहरी भागात नगर परिषद / नगर पंचायत इथे करावी.
- स्थानिक स्वराज्य संस्थेतील ग्रामसेवक व शहरी भागातील मुख्याधिकारी, नगर परिषद / नगर पंचायत यांनी नियोजित तारखेच्या वेळेस संबधित ठिकाणी भेट देवुन या कार्यालयाचे कार्यालयीन आदेश दि.14.06.2021
मधील आपणास आदेशित केलेल्या सूचनांनुसार कार्यवाही अनुसरावी व सदरील ठिकाणी नियोजित वेळेस भेट देवुन कोवीड-19 विषाणूचा संसर्ग रोखण्याबाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचा भंग होत असल्यास संबधित विवाह समारंभ आयोजकावर नियमानुसार भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई
करावी. - लग्न समारंभ आयोजकांनी उपस्थिती लोकांना विवाह स्थळी पुरेसा प्रमाणात सॅनिटायझर उपलब्ध करुन
द्यावे. सर्व उपस्थितांना मास्क घालणे बंधनकारक करावे, लग्न स्थळी अनावश्क गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच एकाच ठिकाणी समुहामधील उपस्थिती टाळावी. - लग्ना करिता बैठक व्यवस्थेमध्ये व भोजन व्यवस्थेमध्ये सामाजिक अंतर राखले जाईल याची दक्षता घ्यावी व
त्याप्रमाणे बैठक व्यवस्था व भोजन व्यवस्था ठेवावी. - विवाह समारंभ आयोजक यांनी लग्नाकरिता लग्न कार्यालय / मॅरेज हॉल / हॉटेल हॉल इ. ठिकाणी विवाहाचे आयोजन न करता राहत्या घरी जरी लग्न आयोजित करणार असल्यास त्यानी देखील सर्व प्रथम स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक असेल. व वरील सर्व नियमावली चे पालन करणे त्यांना देखील बंधनकारक असेल.
सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणा आणि सर्व संबधित विभागांची राहील.
उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.असे आदेश आज रविंद्र जगताप जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बीड यांनी दिले आहेत