बीड जिल्ह्यात १८ वर्ष वयावरील नागरीकांसाठी उद्यापासून लसीकरणाची सुरुवात
कोविड १९ महामारीच्या प्रतिबंधासाठी १६ जानेवारी पासुन कोविड १९ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. १८ वर्षापेक्षा जास्त वयोगटाच्या नागरिकांसाठी दिनांक २३ जून २०२१ रोजी पासून कोविड लसीकरण सुरु करण्यात येत आहे. तरी १८ वर्षा पुढील वयोगटातील नागरीकांनी जवळच्या लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरण करुन घ्यावे.
१८ वर्षे वयावरील सर्व नागरीकांना प्रत्यक्ष लसीकरण केद्रावर न जाता घरबसल्या लसीकरणासाठी http://ezee.live/Beed-covid19-reistration या लिंकद्वारे Needly app द्वारे नोंदणी करता येणार आहे. उपलब्ध होणाऱ्या लससाठया नुसार टोकन क्रमांकानुसार त्यांचा नंबर आल्यावर sms/call माध्यमातुन लसीकरणासाठी बोलावण्यात येणार आहे. हि व्यवस्था १८ वर्षावरील सर्व नागरीकांसाठी लागु राहिल. ज्यांचेकडे Android mobile नाहित अशा व्यक्तींना इतर कोणत्याही व्यक्तींकडुन नोंदणी करुन घेता येईल.
केंद्रावर आल्यानंतर आपण लसीकरणाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पात्र असाल तरच (फक्त १८ वर्षा पेक्षा जास्त वय) लसीकरण करण्यात येईल याची नोंद घ्यावी. नागरीकांनी लसीकरण केद्रांवर गर्दी टाळावी व कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करावे तसेच दिलेल्या दिवशी, दिलेल्या वेळेत लसीकरण केद्रांवर यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार जिल्हा परिषद, बीड यांनी केले आहे