बीड जिल्ह्याचा आकडा वाढला असला तरी संसर्गाचे प्रमाण कमीच
बीड-जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी एक हजार लोकांच्या टेस्टिंग मध्ये 340 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते,म्हणजे 10 हजार टेस्टिंग झाल्या तर साडे तीन हजार रूग्णवाढ झालेली आपण पाहिली आहे आज हेच प्रमाण साडे सहा टक्के आहे हीच मोठी दिलासादायक बाब जिल्ह्यासाठी महत्वाची ठरू लागली आहे लोकांनी अजूनही नियमांचे पालन काटेकोरपणे केले व स्वतः काळजी घेतली तर जिल्ह्याला कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही,बाधितांचे प्रमाण वाढू नये यासाठीच वेळोवेळी प्रशासनाकडून सूचना केल्या जात आहेत त्या केवळ जिल्ह्यात अजून कडक निर्बन्ध लागू नयेत यासाठीच,त्यामुळे नागरिकांनी आता सतर्कता बाळगून काही दिवस तरी गर्दी टाळून रोजचे व्यवहार करावेत
बीड जिल्ह्यात पॉझिटिव रुग्णांची संख्या गेल्या 8 दिवसात कमी दिसत असली तरी बीड जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.67 टक्के इतकी आहे गेल्या 24 तासात 8 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून 2407 रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे आज 159 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून जिल्ह्याचा सरासरी पॉझिटिव्ह रेट 15.25 टक्के आहे
बीड जिल्ह्यात एकूण 90 हजार 37 रुग्ण संख्या झाली असून यामध्ये 86 हजार 259 इतके रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत
सध्या बीड जिल्ह्यात 1371 रुग्णांवर उपचार सुरू असून 8 हजार 634 बेड शिल्लक आहेत बीड जिल्ह्यात 152 कोविड सेंटरवर 10005 इतक्या रुग्णांची व्यवस्था आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे सध्या बीड जिल्ह्यात 95.80 टक्के बरे होण्याचे प्रमाण आहे
एका बधितांपासून अनेक बाधीत रुग्ण होण्याचे प्रमाण लक्षात घेता आज तरी संसर्गाचा धोका कमी आहे फक्त नियम पाळणे नागरिकांच्या हातात आहे,बाधीत रुग्णांची टक्केवारी जर अशीच कमी राहिली तर बीड जिल्हा काही दिवसात कोरोनामुक्त होऊ शकतो याकडे सर्वांनी गंभियाने पहायला हवे