बीड

बीड जिल्ह्यात आकडा वाढला:224 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात आणि देशात बाधीत संख्या कमी

बीड जिल्ह्यात आज दि 17 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3424 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 224 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3200 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 18 आष्टी 43 बीड 30 धारूर 8 गेवराई 28 केज 34 माजलगाव 6 परळी 20 पाटोदा 11 शिरूर 17 वडवणी 9 असे रुग्ण आढळून आले आहेत.

२४ तासांत राज्यात १० हजार १०७ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन नव्या करोना बाधित रुग्णांची (Corona patients) संख्या ८ हजार ते १० हजाराच्या आसपास फिरताना दिसत आहे. आज दिवसभरात १० हजार १०७ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. याबरोबरच आज एकूण १० हजार ५६७ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, आज दिवसभरात २३७ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

आजच्या २३७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर १.९४ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ७९ हजार ७४६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०७ टक्क्यांवर पोहोचले आहे.राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ३६ हजार ६६१ इतकी झाली आहे.

देशातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकडेवारीची गती कमी

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकडेवारीची गती काहीशी कमी झाली आहे. कोरोनाबाधितांची आकडेवारी सलग दहाव्या दिवशी एक लाखांहून कमी आली आहे. गेल्या 24 तासांत देशात 67,208 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे, तर 2330 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात एक लाख तीन हजार 570 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी मंगळवारी देशात 62 हजार 224 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर दोन हजार 542 रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 1.28 टक्के इतका आहे तर रिकव्हरी दर हा 96 टक्के इतका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *