ऐतिहासिक स्थळे आणि वस्तुसंग्रहालये पर्यटकांसाठी खुली करण्यास परवानगी
नवी दिल्ली – गेल्या वर्षी १७ मार्चला सर्व ऐतिहासिक स्थळे करोना संसर्गाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी पर्यटकांकरीत बंद केली होती. मात्र आता त्यानंतर जुलैमध्ये सर्वांसाठी ती खुली करण्यात आली होती. पण एप्रिलमध्ये महिन्यात दुसऱ्या लाटेमुळे पुरातत्व विभागाने आदेश काढून ऐतिहासिक स्थळे पर्यटकांसाठी बंद केली होती.
आता मात्र देशभरातील 3,693 ऐतिहासिक स्थळे आणि 50 वस्तुसंग्रहालये पर्यटकांसाठी खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आग्र्यामधील ताजमहाल, आग्रा किल्ला, फतेहपूर सीकरी, एत्माद्दौला, सिकंदरा, महताब बाग यासह स्मारकांसह 50 वस्तुसंग्रहालये आजपासून खुली करण्यात आली आहे.
केंद्र व राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कोरोना निर्बंधांचे पालन करून ऐतिहासिक स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
याबाबत केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी ट्विट केले आहे कि,’कोरोना नियमावली पाळून पर्यटकांना 16 जूनपासून ऐतिहासिक स्थळांना भेटी देता येतील’ तसेच ताजमहालमध्ये प्रवेश करण्यासाठी काही नियम बनविण्यात आले आहेत, जे प्रत्येक पर्यटकांना पाळावे लागतील. एका वेळी फक्त 100 लोकांना प्रवेश मिळेल असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, दुसऱ्या लाटेच्या हाहाकारामुळे आग्र्यामधील ताजमहाल, आग्रा किल्ला, फतेहपूर सीकरी, एत्माद्दौला, सिकंदरा, महताब बाग यासह स्मारकांनाही टाळे ठोकण्यात आले होते. देशातील प्रमुख स्मारकांपैकी कुतुब मीनार, हुमायूंचा मकबरा, अजिंठा एलोराच्या लेण्यांसह 200हून अधिक ऐतिहासिक वास्तू, पुरातत्त्व स्थळे आणि संग्रहालयेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत होते.