बीड जिल्ह्यात आज 165 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक
बीड जिल्ह्यात आज दि 16 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2895जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 165 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2730 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 5 आष्टी 29 बीड 25 धारूर 4 गेवराई 20 केज 28 माजलगाव 6 परळी 14 पाटोदा 7 शिरूर 22 वडवणी 5 असे रुग्ण आढळून आले आहेत.
गेल्या २४ तासांत राज्यात ९ हजार ३५० नवे रुग्ण
मुंबई: राज्यात काल दिवसभरात ९ हजार ३५० नव्या करोना (Coronavirus) बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. याबरोबरच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या निदान झालेल्या रुग्ण संख्येहून अधिकच आहे. आज एकूण १५ हजार १७६ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, दिवसभरात ३८८ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे
कालच्या ३८८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर १.९३ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ६९ हजार १७९ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६९ टक्क्यांवर पोहोचले आहे.