राज्यातील शाळा महाविद्यालयात शिक्षकांच्या उपस्थितीबाबत शिक्षण संचालकांनी काढले आदेश
राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष मंगळवारी १५ जूनपासून चालू झाले आहे. सध्या मुलांना शाळेत प्रवेश नसला तरी कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षकांची उपस्थिती 50 टक्के तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आणि मुख्याध्यापक व प्राचार्यांना 100 टक्के उपस्थितीचे आदेश राज्य शिक्षण संचलनालायाचे शिक्षण संचालक द.गो. जगताप यांनी दिले आहेत.
इयत्ता १ ली ते ९ वी व इयत्ता ११ वी चे ५०% शिक्षकाना शाळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. परंतु इयत्ता १० वी व १२ वी च्या शिक्षकांची निकाल जाहीर करण्याचे काम चालू असल्याने उपस्थिती१००% असणे अनिवार्य आहे.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थितीही १००% असणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांची उपस्थिती १००% असावी असेही शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील सुचना मिळेपर्यंत शाळा बंद असल्यातरी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन वा प्रशिक्षण परिषद पुणे (SERTC) यांच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे आॕनलाईन व इतर माध्यमातून विद्यार्थांचे शिक्षण सुरळीतपणे चालू राहिल याची दक्षता घ्यावी, असेही शिक्षण संचालकानी आपल्या आदेशात म्हटले आहे.