राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागाशी संबंधित रिक्त पदे भरण्यास मान्यता
मुंबई : करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि इतर साथरोगांची शक्यता लक्षात घेऊन ग्रामीण भागातील जनतेला तत्काळ आरोग्यसेवा मिळणे अत्यावश्यक असल्याने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागाशी संबंधित रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाने सोमवारी या संदर्भात जारी केलेल्या शासन आदेशात भरती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या सेवेतील रिक्त पदे भरण्यासाठी मार्च २०१९ मध्ये मेगा भरतीची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर लगेचच लोकसभा व विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली, तसेच राज्यातील सत्तांतरानंतर महापरीक्षा पोर्टल रद्द करण्यात आले, त्यामुळे अद्यापर्यंत ही मेगाभरती होऊ शकली नाही.
गेल्या वर्षांपासून करोना साथरोगाचा निकराचा सामना कराव्या लागलेल्या राज्य सरकारला आर्थिक अडचणीमुळे नोकरभरतीवर र्निबध घालावे लागले. त्यातून आरोग्याशी संबंधित रिक्त जागा भरण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक व आरोग्य सेविका या पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. एकू ण भरती प्रक्रियेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. २३ ऑगस्टपर्यंत निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक मागासप्रवर्ग आरक्षण कायदा रद्द के ला आहे. त्यामुळे २०१९ च्या जाहिरातीत एसईबीसीसाठी राखीव पदे ठेवली असतील तर ती अराखीव पदांमध्ये रुपांतरीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.