बीड

बीड जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी असली तरी एकाच दिवसात दहा जणांचा मृत्यू

बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात पॉझिटिव रुग्णांची संख्या गेल्या 8 दिवसात कमी दिसत असली तरी बीड जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के इतकी आहे गेल्या 24 तासात 10 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून 2346 रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे आज 210 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 15.39 टक्के आहे

बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले होते एका एका दिवशी पंधराशे च्या पुढे रुग्ण आढळून आले आहेत मात्र हे प्रमाण हळूहळू कमी होऊन दीडशेच्या खाली आले असून आज बीड जिल्ह्यात 210 रुग्णांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली आहे जिल्ह्यात एकूण 89 हजार 491 रुग्ण संख्या झाली असून यामध्ये 85 हजार 587 इतक्या रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत


सध्या बीड जिल्ह्यात 1558 रुग्णांवर उपचार सुरू असून 8 हजार 447 बेड शिल्लक आहेत बीड जिल्ह्यात 152 कोविड सेंटरवर 10000 इतक्या रुग्णांची व्यवस्था आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे सध्या बीड जिल्ह्यात 95.3 टक्के बरे होण्याचे प्रमाण आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *