ऑनलाइन वृत्तसेवावृत्तसेवा

शेतकऱ्यांनो सावधान! पेरणीची घाई करू नका, कृषी विभागाचं आवाहन

आज मान्सून सक्रिय झाला असून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली. परंतु जमिनीत किमान सात इंच ओलावा आणि शंभर मिलिमीटर पाऊस झाल्या शिवाय पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.
आधीच बियाणे महाग आहे. त्यात दुबारा पेरणीचा खर्च शेतकऱ्यांना परवडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी 15 ते 17 जून नंतरच पाऊस पाहून पेरणी करावी आणि बियाण्याची उगवण शक्ती तपासावी असं आवाहनदेखील कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी हे घाईगडबडीने पेरणी करत आहे. अशात पाऊस अचानक निघून जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकटदेखील होते. त्यामुळे हे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी.

तसेच बियांणे शेतात पेरण्यापूर्वी त्याची उगवण क्षमता तपासण्याचे काम शेतकऱ्यांनी करावे असा सल्लाही कृषी विभागाने दिला आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील एक आठवडापर्यंत असाच पाऊस असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *