बीड

बीड जिल्ह्यात आज 130 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात आणि देशातही पुन्हा रूग्णवाढ

बीड जिल्ह्यात आज दि 11 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2866 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 130 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2736 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 15 आष्टी 9 बीड 28 धारूर 7 गेवराई 4, केज 23 माजलगाव 13 परळी 4 पाटोदा 5, शिरूर 16 वडवणी 6 असे रुग्ण आढळून आले आहेत.

महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा:राज्यात १२ हजारांहून अधिक नवे करोना रुग्ण

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोना रुग्णसंख्येचा आलेख घसरणीला लागल्याचं पाहायला मिळालं. मात्र हा ट्रेंड आज बदलला असून राज्यात मागील २४ तासांत १२ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद (Maharashtra Corona Cases Today) झाली आहे. राज्यात आज १२ हजार २०७ नवे रुग्ण आढळले असून करोनामुळे ३९३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच आज ११ हजार ४४९ करोना रुग्ण बरे होऊन घरी परतले.
मागील आठवड्याभरात दिवसागणिक करोना रुग्णांची संख्या १० हजारांच्या आसपास आढळत होती. मात्र आज या आकड्यात वाढ झाली आहे. अनलॉक प्रक्रियेनंतर सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीचा तर हा परिणाम नाही ना, अशी शंका आता निर्माण झाली आहे.

राज्यात सध्या १ लाख ६० हजार ६९३ सक्रिय रुग्ण आहेत, तर आजपर्यंत ५८ लाख ७६ हजार ८७ नागरिकांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यातील ५६ लाख ८ हजार ७५३ जणांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. मात्र १ लाख ३ हजार ७४८ जणांना या आजारामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

देशातल्या दैनंदिन बाधितांच्या संख्येतही वाढ

देशात गेल्या २४ तासांत झालेल्या मृत्यूंची संख्या ही एका दिवसातली सर्वाधिक संख्या आहे. देशातल्या दैनंदिन बाधितांच्या संख्येतही वाढ झालेली दिसून येत आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,  देशात गेल्या २४ तासात एका दिवसातल्या सर्वाधिक म्हणजे ६,१४८ करोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे आता मृतांचा आकडा तीन लाख ५९ हजार ६७६ झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातल्या मृत्यूंची संख्या तीन हजारांच्या खाली आली होती. मात्र, आता झालेली वाढ चिंताजनक आहे. देशातला मृत्यूदर आता १.२३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशातल्या दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येतही वाढ झालेली दिसून येत आहे. काल दिवसभरात देशात ९४ हजार ५२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे सध्या उपचाराधीन असलेल्या करोना रुग्णांचा आकडा आता ११ लाख ६७ हजार ९५२ वर पोहोचला आहे. तर काल दिवसभरात देशातले एक लाख ५१ हजार ३६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *