बीड

दिलासादायक:बीड जिल्ह्यात आज168 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्याचा रिकव्हरी रेट वाढला

बीड जिल्ह्यात आज दि 10 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3445 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 168 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3277 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 19 आष्टी 25 बीड 33 धारूर 6 गेवराई 15, केज 25 माजलगाव 12 परळी 9 पाटोदा 5, शिरूर 14 वडवणी 5 असे रुग्ण आढळून आले आहेत.

राज्याचा रिकव्हरी रेट वाढला

राज्यात मागील काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णांपेक्षा (Daily) बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आढळत आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ((Recovery rate) वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 16 हजार 379 रुग्ण कोरोनामुक्त (Corona ) झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.45 टक्के इतके झाले आहे. तर 10 हजार 989 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. याशिवाय 261 कोरोनाबाधित Coronavirus रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज रोजी एकूण 1 लाख 61 हजार 864 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण 55 लाख 97 हजार 304 कोरोनाबाधित (Coronavirus ) रुग्ण बरे झाले आहेत.तर राज्यात आजपर्यंत 1 लाख 1 हजार 833 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्याचा मृत्यूदर 1.74 टक्के एवढा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *