आज (गुरुवारी)शनिदेव जयंती:कोणत्या राशीच्या लोकांनी कशी करावी पूजा,जाणून घ्या
यंदा गुरुवार १० जून २०२१ रोजी शनी जयंतीच्या दिवशी सूर्यग्रहण आहे. ही परिस्थिती वृषभ, वृश्चिक आणि मीन राशीसाठी लाभाची आहे. पण मिथुन, तुळ, धनु, मकर, कुंभ या राशीच्या नागरिकांनी शनि देवाची पीडा टाळण्यासाठी काही उपाय करणे आवश्यक आहे, असे ज्योतिषांनी सांगितले
शनिची साडेसाती अथवा ढय्या असताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते असे म्हणतात. यामुळेच शनिदेवाची कृपा राहावी यासाठी दर शनिवारी आणि शनी जयंतीच्या दिवशी शनिची मनोभावे पूजा करतात.
शनिची साडेसाती म्हणजे शनि पीडेचा साडेसात वर्षांचा कालावधी. तसेच एखाद्या राशीवर शनि ग्रह विराजमान झाला तर तिथे त्याचा मुक्काम अडीच वर्षे असतो. या कालावधीला ढय्या असे म्हणतात. सध्या धनु, मकर, कुंभ या राशींची साडेसाती तर मिथुन आणि तुळ राशीची ढय्या सुरू आहे. यामुळेच मिथुन, तुळ, धनु, मकर, कुंभ या पाच राशींच्या लोकांनी शनिची पीडा टाळण्यासाठी शनि मंदिरात जाऊन देव दर्शन करावे. शनि देवाची मनोभावे पूजा करावी. कोरोना संकटामुळे शनि मंदिरात शक्य नसेल अथवा जवळ शनि मंदिर नसेल किंवा कोणत्याही शनि पूजेचा विधी करणे शक्य नसेल तर घरातच देवासमोर बसून शनि देवाचे स्मरण करावे. शनिमहात्म्य, शनिस्तोत्र, शनि देवाची आरती म्हणून किंवा वाचून शनि देवाची आराधना करावी. यामुळे शनि देव प्रसन्न होतील आणि शनि पीडेचा त्रास कमी होण्यास मदत होईल, असे ज्योतिषांचे म्हणणे आहे. शनि जयंतीच्या दिवशी गरीबांना अन्नदान करावे, गायीला चारा द्यावा, पशूपक्ष्यांना अन्न-पाणी द्यावी. गरजूंना मदत करुन त्यांच्या अडचणी सोडवण्यास मदत करावी. यामुळेही शनि देव प्रसन्न होतील आणि शनि पीडेचा त्रास कमी होण्यास मदत होईल, असे ज्योतिषांचे म्हणणे आहे.