एसटी कर्मचाऱ्यासाठी आनंदाची बातमी:ठाकरे सरकारकडून महामंडळाला 600 कोटींची मदत
मुंबई, 9 जून: महाराष्ट्राची लाल परी अर्थात एसटी (ST) गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात सापडल्याचं पहायला मिळत आहे. याच एसटी महामंडळाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला 600 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचं जाहीर केलं आहे अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.
कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊन यामुळे एसटीची वाहतूक सुद्धा पूर्ण क्षमतेने सुरू नव्हती.
त्यानंतर पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा लॉकडाऊन लागू झाला. आता कुठे पुन्हा 50 टक्के आसन क्षमतेने वाहतूक सुरू झाली आहे. या सर्वांचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर झाला. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचाही प्रश्न समोर आला. आता राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार असल्याने एसटीच्या 98 हजार कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन देणं शक्य होणार आहे.
यापूर्वी देखील परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडुन तब्बल1 हजार कोटी रुपये एसटी महामंडळाला मिळवुन दिले. त्यातून गेल्या सहा महिन्यांमध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देणे शक्य झाले. एसटी महामंडळाकडून आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे.
एसटीच्या मालवाहतूकीला सक्षम करण्यासाठी शासनाच्या विविध 17 विभागांच्या एकूण मालवाहतूकी पैकी 25 % मालवाहतूक एसटीच्या “महाकार्गो” ला मिळाली