बीड जिल्ह्यात आज फक्त 146 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यातही लाट ओसरू लागली
बीड जिल्ह्यात आज दि 9 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2813 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 146 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2667 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 13 आष्टी 16 बीड 22 धारूर 13 गेवराई 9, केज 26 माजलगाव 12 परळी 13 पाटोदा 11, शिरूर 8 वडवणी 3 असे रुग्ण आढळून आले आहेत.
गेल्या २४ तासांत राज्यात १० हजार ८९१ नवीन रुग्णांचे निदान
मुंबई: राज्यात काल दिवसभरात १० हजार ८९१ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज निदान झालेल्या रुग्ण संख्येहून अधिकच आहे.काल एकूण १६ हजार ५७७ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, दिवसभरात २९५ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या २९५ मृत्यूच्या आकड्याबरोबरच राज्यातील मृत्यूदर १.७३ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५५ लाख ८० हजार ९२५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.३५ टक्क्यांवर पोहोचले आहे.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ६७ हजार ९२७ इतकी झाली आहे.