बीड

दिलासादायक:बीड जिल्ह्यात आज फक्त 132 पॉझिटिव्ह रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 8 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3100जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 132 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2968 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 23 आष्टी 28 बीड 14 धारूर 5 गेवराई 4, केज 23 माजलगाव 10 परळी 1 पाटोदा 9, शिरूर 11 वडवणी 4 असे रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यातील करोना संक्रमणाचे प्रमाण हळूहळू कमी

मुंबई – राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असून करोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारने केलेल्या प्रयत्नांनाही यश येताना दिसत आहे. राज्यात आज 10,219 रुग्ण आढळून आल्याने राज्यातील करोना संक्रमणाचे प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे येत्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा अनलॉक होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात सोमवारी 10,219 नवीन रुग्णांचे निदान झाले असून, राज्यात सोमवारी 154 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृत्यूदर हा 1.72 टक्‍के एवढा झाला. राज्यात आज 10,219 नवीन रुग्ण सापडल्यानंतर आज रोजी एकूण 1,74,320 सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 58,42,000 झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *